आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामनावीर कोहली अवाक्; ‘ड्रॉ’वर समाधान, आफ्रिकेने विजयासाठी प्रयत्न न केल्याने धक्का !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोहान्सबर्ग - कसोटी विजयासमीप पोहोचलेल्या द. आफ्रिकेने ऐनवेळी गुडघे टेकले. विजयासाठी प्रयत्नही सोडून दिले. सामना अनिर्णीतच राखला. हे सारे आमच्यासाठी धक्कादायक होते, असे सामनावीर विराट कोहलीने म्हटले.
भारताच्या विशाल 458 धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेने 450 धावांवर समाधान मानले. अवघ्या आठ धावांनी हातातोंडाशी आलेला विजय हिरावला. खासकरून समोर फिलेंडरसारखा तगडा फलंदाज असतानाही हे त्यांना जमले नाही याचेच कोहलीला आश्चर्य वाटले.
आम्हाला प्रत्येकालाच धक्का बसला. विजयासाठी प्रयत्न करणे आफ्रिका सोडून देईल असे वाटले नव्हते. खासकरून जेव्हा आठच धावा हव्या होता तेव्हा समोर फिलेंडर होता. तो दणकेबाज फलंदाज आहे. कोणालाही लीलया टोलवू शकतो हे आम्ही भूतकाळात अनेकदा पाहिले आहे. मात्र, काय घडले माहीत नाही. आमची योजना तयारच होती. आम्हाला गडी टिपायचे होते. आम्ही त्याच दिशेने जात होतो. मात्र, यजमानांनी अचानक बचावात्मक पवित्रा घेतल्याने आश्चर्याचा मोठा धक्का बसला, असे विराटने सांगितले.


पुढील स्लाइडमध्ये, डु प्लेसिसने तारे दाखवले