आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Virat Kohli Special ODI Record On Cards In Champions Trophy

...तर क्रिकेट इतिहासात विराट बनेल \'सुपर इंडियन\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीम इंडियाचा उपकर्णधार विराट कोहली वेस्‍ट इंडीजविरूद्ध आपला 100 वा वनडे सामना खेळणार आहे. असा करणारा तो टीम इंडियाचा 30 वा फलंदाज असेल.

2008मध्‍ये पदार्पण करणा-या विराटने आतापर्यंत 99 वनडेमध्‍ये 49.21च्‍या सरासरीने 4085 धावा केल्‍या आहेत. यामध्‍ये 13 शतके आणि 22 अर्धशतकांचा समावेश आहे. विद्यमान भारतीय टीमचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी (220) आणि सुरेश रैना (160) यांनीच विराटपेक्षा सर्वाधिक सामने खेळले आहेत. विराटने 18 ऑगस्‍ट 2008 रोजी दाम्‍बुला येथे श्रीलंकाविरूद्ध आपल्‍या करिअरची सुरूवात केली होती. आपल्‍या जबरदस्‍त खेळीच्‍या जोरावर विराट लवकरच टीम इंडियाचा मॅच विनर खेळाडू बनला. आता तो तिस-या क्रमांकावर फलंदाजी करतो.

विराट आयपीएलमध्‍ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा कर्णधार आहे. भविष्‍यातील टीम इंडियाचा कर्णधार म्‍हणूनही त्‍याच्‍याकडे पाहिले जाते. कमी वयात त्‍याने अनेक विक्रम आपल्‍या नावे केले आहेत. आता तो एलीट ग्रूपमध्‍ये प्रवेश करीत आहे. या क्‍लबमध्‍ये सौरव गांगुली, राहूल द्रविडसारख्‍या मातब्‍बरांनाही जागा मिळाली नाही. मात्र, कोहलीने याचे सदस्‍यत्‍व घेण्‍याची तयारी सुरू केली आहे. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या कोणत्‍या क्‍लबमध्‍ये सामील होतोय विराट कोहली...