आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Virat Kohli Struggling For Best Performance, Divya Marathi

फॉर्मसाठी विराट कोहलीची झुंज! इंग्लंडविरुद्ध चार वनडेत एकूण ५४ धावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नुकत्याच झालेल्या इंग्लंड दौ-यात सपशेल अपयशी ठरलेला विराट कोहली सध्या घरच्या मैदानावरही फॉर्मासाठी झुंज देत आहे. या वेळी त्याला होमग्राउंडवरही अपयशाला समोरे जावे लागत असल्याचे चित्र सध्या स्पष्ट होत आहे.

वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे मालिकेतील सलामी सामन्यात अवघ्या दोन धावा काढून विराट कोहलीने तंबू गाठला. या वेळी त्याला केवळ पाच चेंडूंचा सामना करता आला. यापूर्वी इंग्लंडविरुद्ध पाच कसोटींच्या दहा डावांत विराटने १, ८, २५, ०, ३९, २८, ०, ७, ६ आणि २० अशा प्रकारची खेळी केली. याशिवाय त्याला इंग्लंडविरुद्ध वनडेतही ०, ४०, १* आणि १३ धावांची खेळी करता आला. यादरम्यान मॅच विजेत्या मानल्या जाणा-या विराट कोहलीने १३९ सामन्यांत ५०.८० च्या सरासरीने ५६९० धावा काढल्या. यात १९ शतक आणि ३० अर्धशतकांचा समावेश आहे.

पुढे वाचा धोनी काय म्हणतोय...