Home | Sports | From The Field | virat kohli surpasses brian lara record in odi

विराट कोहलीने टाकले लारा, चॅपल यांना मागे

agency | Update - Jun 09, 2011, 02:07 PM IST

वेस्टइंडीजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 81 धावांची खेळी करणाऱ्या विराट कोहलीने एक विक्रम नोंदविला आहे.

  • virat kohli surpasses brian lara record in odi

    पोर्ट ऑफ स्पेन - वेस्टइंडीजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 81 धावांची खेळी करणाऱ्या विराट कोहलीने एक विक्रम नोंदविला आहे.

    भारताच्या मधल्या फळीतील महत्त्वाचा फलंदाज असलेल्या कोहली एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेगवान 2000 धावा बनविणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने 53 डावांमध्ये 2000 धावा पूर्ण करण्याची कामगिरी केली आहे. या कामगिरीमुळे त्याने ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू ग्रेग चॅपेल आणि वेस्टइंडीजचा महान फलंदाज ब्रायन लारा यांना मागे टाकले आहे. लारा आणि चॅपेल यांना 2000 धावा करण्यासाठी 54 डाव खेळावे लागले होते.

    भारताकडून वेगवान 2000 धावा करण्याचा मान माजी कर्णधार सौरव गांगुली याच्या नावावर आहे. गांगुलीने 52 डावांत 2000 धावा पूर्ण केल्या होत्या. गांगुलीने 2000 धावांचा टप्पा 1998मध्ये कानपुर येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात पूर्ण केला होता. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी म्हणजे 40 डावात 2000 धावा पूर्ण करण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज हाशिम आमला याच्या नावावर आहे.Trending