आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Virat Kohli To Captain Team India In Asia Cup 2014 News In Marathi

ASIA CUP: महेंद्रसिंह धोनीपेक्षा \'उत्‍कृष्ट कर्णधार\' ठरू शकतो विराट कोहली!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीला पाठदुखीचा त्रास होत असल्याने तो बांगलादेशात होणार्‍या आशियाई क्रिकेट स्पर्धेत खेळणार नाही. त्यामुळे कर्णधारपदाची जबाबदारी विराट कोहली तर यष्‍टीरक्षकाची जबाबदारी दिनेश कार्तिक सांभाळणार आहेत.

धोनीच्‍या गैरहजेरीत भारतीय संघाचे नेतृत्त्व आतापर्यंत वीरेंद्र सेहवाग, सुरेश रैना, विराट कोहली आणि गौतम गंभीर यांनी केले आहे. विशेष म्हणजे या सगळ्यामध्ये विराट कोहली याची कामगिरी सरस ठरली आहे.

आशिया चषकमधील पहिला सामना 25 फेब्रुवारी रोजी पाकिस्‍तानविरद्ध श्रीलंका यांच्‍यात खेळला जाईल. तर 26 फेब्रुवारी रोजी भारतविरुद्ध बांगलादेश खेळला जाईल. बांगलोदशातील खेळपट्ट्या फलंदाजीस पोषक आहेत. त्‍यामुळे कोणताही संघ धावांचा डोंगर उभा करु शकतो असे मत, पाकिस्‍तानी संघाचे प्रशिक्षक अकरम यांनी व्‍यक्‍त केले.

गेल्‍या आशिया चषकात भारताला बांगलादेशने मात दिली होती. दक्षिण आफ्रिका आणि न्‍यूझीलंडमध्‍ये सपाटून मार खावा लागलेल्या भारतीय क्रिकेट संघासाठी विजयरुळावर आरुढ होणे जिकिरीचे असणार आहे. ही लढत म्‍हणजे विराटच्‍या नेतृत्‍वाची कसोटी असणार आहे. यावर्षी अफगाणिस्‍तान संघ या चषकात नव्‍याने प्रवेश करत आहे.

पुढील स्‍लाईडवर वाचा, धोनीच्‍या अनुपस्थितीत कोणत्‍या कर्णधारांनी भारताला विजय मिळवून दिला.