(फाइल फोटो - भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली)
मुंबई- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) निवड समितीने ऑस्ट्रेलियाविरूद्ध चार कसोटी सामन्यांसाठी भारतीय क्रिकेट संघाची आज (सोमवारी) घोषणा केली. ऑस्ट्रेलिया दौर्यासाठी बीसीसीआयने नव्या चेहर्यांना संधी दिली आहे. तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्याचे नेतृत्त्व युवा फलंदाज विराट कोहलीकडे सोपवण्यात आले आहे. कर्णधार
महेंद्र सिंह धोनीला एका लढतीसाठी विश्रांती देण्यात आली आहे.
भारतीय संघात युवा फलंदाज के. लोकेश राहुल, फिरकी गोलंदाज करण शर्मा आणि नमन ओझाला संधी देण्यात आली आहे. उल्लेखनिय म्हणजे अष्टपैलू सुरेश रैनाचेही कसोटी संघात पुनरागमन झाले आहे.
भारतीय संघ 2015 मध्ये होणार्या विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलिया दौरा करणार आहे. भारत या दौर्यात ऑस्ट्रेलिया विरोधात चार कसोटी सामने तसेच एका एकदिवसीय मालिका खेळणार आहे. चार डिसेंबरपासून ब्रिसबेन येथे होणार्या पहिल्या कसोटी सामन्यात कर्णधार महेंद्र सिंह धोनी दिसणार नाही. धोनीला एका सामन्यासाठी आराम दिला आहे. धोनीच्या गैरहजेरीत युवा क्रिकेटर विराट कोहली भारतीय संघाचे नेतृत्त्व करणार आहे. तसेच संघात करन शर्मा आणि लोकेश राहुलच्या रुपात दोन नव्या चेहर्यांना संधी देण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध असा राहिल भारतीय संघ...
महेंद्र सिंह धोनी, विराट कोहली, शिखर धवन, मुरली विजय, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, सुरेश रैना, रिद्धिमान साहा, नमन ओझा, रविचंद्रन अश्विन, करन शर्मा, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, उमेश यादव आणि वरुण आरोन.
पुढील स्लाइड्सवर वाचा, श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम दोन वनडेमध्ये दिसणार नाही शिखर धवन...