आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Virat Kohli To Takeover MS Dhoni\'s Place In Test Team As Captain

...तर BCCI धोनीकडून हिसकावणार कसोटीच्या कर्णधारपदाची जबाबदारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : धोनी आणि विराट

नवी दिल्ली - ऑस्ट्रेलियाच्या विरोधात टीम इंडिया संपूर्ण कसोटी मालिका विराट कोहलीच्या नेतृत्वात खेण्याची शक्यता आहे. भारतीय क्रिकेट टीम पूर्णवेळ कर्णधार असलेल्या महेंद्रसिंह धोनीच्या आरामाच्या कालावधीत वाढ करण्याची शक्यता आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड टेस्ट टीममधून धोनीची कामयची सुट्टी करण्याच्याही विचारात आहे.
विराटकडे जबाबदारी सोपवण्यापूर्वी निवडसमितीच्या सदस्यांची नजर अॅडलेडमध्ये होणा-या पहिल्या कसोटीच्या निकालारकडे असणार आहे. भारतीय संघाला हा सामना ड्रॉ करण्यातही यश आले तर धोनीला या मालिकेपासून दूर ठेवण्याचा विचार करण्यात येत आहे. पूर्णपणे फिट नसल्याचे कारण सांगून धोनीला यापासून दूर ठेवले जाण्याची शक्यता आहे. त्यात जर टीम इंडियाने या सामन्यात विजय मिळवला तर कसोटी संघात धोनीच्या पुनरागमनाचे रस्ते जवळपास बंद होणार आहेत.

नेमके दुखणे काय?
धोनीच्या फिटनेसबाबत बोर्डाचे अधिकारी वेग-वेगळी वक्तव्ये करत आहेत. कोणी त्याच्या कोपराला मार लागल्याचे सांगत आहे. तर कोणी मनगटाला दुखापत झाल्याचे म्हणत आहे. एका अधिका-याने तर त्याच्या अंगठ्याला दुखापत झाल्याचे म्हटले आहे. याच दुखापतीमुळे सुमारे दोन महिन्यांपासून धोनी संघातून बाहेर आहे.

ISL मध्ये केले गोल किपींग
धोनी इंडियन सुपर लीग फुटबॉलमध्ये त्याच्या टीम चेन्नईयन एफसीच्या सामन्यात फॅन्ससाठी गोलकिपिंग करताना आढळून आला. तसेच त्या दुखापतग्रस्त हाताने तो जोरदार शॉट अडवतानाही आढळून आले आहे.
पुढे वाचा, कर्णधार म्हणून धोनी आणि विराटची कामगिरी