आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Virat Kohli Wish To Take Yuvraj Singh In Royal Challengers Bangalore Team

IPL : RCBचा कर्णधार विराट कोहलीची युवराज सिंगला संघात घेण्याची इच्छा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - तडाखेबंद फलंदाज युवराज सिंगला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघात घेण्याची त्याचा मित्र विराट कोहलीची इच्छा आहे. याबाबत विराटने युवराज आणि RCB संघ व्यवस्थापनाशी चर्चा केली असल्याची माहिती आहे.
आयपीएल सीजन-7 च्या खेळाडूंचा लिलाव येत्या 12-13 फेब्रुवारी रोजी होणार आहे. बंगळुरु संघाने विराट कोहलीला पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला आहे तर, पुणे वॉरियर्सचा संघ आता नसल्यामुळे युवराजसिंग देखील लिलावासाठी उपलब्ध आहे.
विजय मल्ल्या यांचा संघ रायल चॅलेंजर्स बंगळुरु आतापर्यंत एकदाही आयपीएल विजेता ठरलेला नाही. गेल्या सहा वर्षांच्या दुष्काळ यंदा संपवण्याचा निर्धार RCBने केलेला दिसत आहे.