आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Virat Reached Anushka's Home After Arrived At Airport

विमानतळावरून विराट पोहोचला थेट अनुष्काच्या घरी, '‍डेटिंग' सुरू असल्याचे स्पष्‍ट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कोणी मानो अथवा इन्कार करो, अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांचे सध्या तरी एकमेकांशी ‘डेटिंग’ सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे. या दोघांमध्ये काही तरी सुरू असल्याची बातमी नोव्हेंबरमध्येच झळकली होती. त्या वृत्ताची खात्री बुधवारी मध्यरात्री झाली. दक्षिण आफ्रिका दौर्‍यावरून परतलेला विराट मुंबई विमानतळावर रात्री 11.15 वाजता पाहोचून थेट अनुष्का शर्माच्या गाडीने रवाना झाला. मुंबईच्या विमानतळावर उतरल्यानंतर भारतीय संघातील खेळाडू विमानतळावरच थांबलेले असताना विराट विमानतळाबाहेर 20 मिनिटे कुणाची तरी वाट पाहत होता. तेवढय़ात अनुष्का शर्माची रेंज रोव्हर (क्र. 7272) दाखल होताच त्या गाडीत विराटचे सामान चढवण्यात आले, तर काही क्षणात आलेल्या अनुष्काच्या ऑडी या गाडीत ( क्र. 9045) विराट बसून रवाना झाला.
शॉम्पूच्या जाहिरातीने आणले एकत्र
यापूर्वी, दोघांनी एका शॉम्पूच्या जाहिरातीत एकत्रित काम केले होते. त्या जाहिरातीने दोघांना एकत्र आणल्यापासूनच प्रेम प्रकरणाला प्रारंभ झाला आहे. दरम्यान, गुरुवारी त्या दोघांना अनुष्काच्या कारमध्ये वर्साेव्याला काहींनी पाहिले, तर काही काळानंतर गाडी पार्क करताना अनुष्का भारतीय संघाच्या विराट कोहलीचा किस घेताना दिसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
मध्यरात्रीपासून अनुष्काच्या घरी
मध्यरात्री अनुष्काच्या घरी पोहोचलेल्या विराट कोहलीने रात्रभर तसेच गुरुवारपर्यंत त्याच घरी मुक्काम केला. अनुष्काच्या एका निकटवर्तीयाने सांगितले की, ते दोघे नियमितपणे एकमेकांना भेटत आहेत. ते एकत्र कोणत्याही कार्यक्रमाला बाहेर जात नाहीत. मात्र, ते दोघे ‘लाँग ड्राइव्ह’वर जात असतात. जेव्हा विराट मुंबईत असतो, तेव्हा तो त्याचा मोकळा वेळ अनुष्कासमवेतच घालवतो, असेही त्या निकटवर्तीयाने सांगितले.