आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीरू, भज्जीकडून फॉर्मात येण्याचे पुरावे हवेत का?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय संघ येत्या काही आठवड्यांमध्ये बांगलादेश आणि इंग्लंडच्या दौर्‍यावर जाणार आहे. या दौर्‍यासाठी संघाची निवडदेखील करण्यात आली आहे. मात्र, या टीममध्ये वीरेंद्र सेहवाग आणि हरभजनसिंगला स्थान मिळाले नाही. निवड समितीच्या या निर्णयाबद्दल माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. वीरेंद्र सेहवाग आणि हरभजनसारख्या सीनियर खेळाडूंची भारतीय संघाला आता गरज नाही का, की या खेळाडूंना आता फॉर्मात आल्याचे अजूनही काही पुरावे द्यावे लागणार आहेत, असेच अनेक प्रश्न आहेत. मात्र, निवड समितीच्या या चुकीवर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. फॉर्मात पुनरागमन करणार्‍या या खेळाडूंना खेळण्याची कोणत्याही प्रकारची संधीच निवड समितीने दिली नाही, ही आश्चर्याची बाब आहे. पुढच्या वर्षी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये वनडे वर्ल्डकप होणार आहे. अशात संधी मिळणे अधिक आवश्यक असते. मी वल्र्डकपचा विषय यासाठी काढला की, प्रत्येक क्रिकेट खेळणार्‍या देशाचा फोकस आता आगामी विश्वचषकाकडे लागलेला आहे. हे सर्व संघ इतर फॉरमॅटमध्ये खेळल्या जाणार्‍या क्रिकेट सामन्यातून मिळणार्‍या विजयाशीदेखील सामंजस्य करण्यात राजी नाहीत.

सीनियर क्रिकेटपटूंनी मोठय़ा स्पर्धेत खेळी करून आपली जबाबदारी पार पाडावी, असा तर्क युवा खेळाडू बांधतात. युवा खेळाडू जोश व उत्साहाने परिपूर्ण आहेत, यात कोणतीही शंका नाही. मात्र, आम्हाला सीनियर खेळाडूंच्या अनुभवाचाही विचार करायला हवा. याच सीनियर खेळाडूंच्या अनुभवाच्या बळावर टीमने विजय मिळवल्याची अनेक उदाहरणे क्रिकेटच्या इतिहासामध्ये आहेत.

1975 च्या वर्ल्डकपमध्ये 39 वर्षीय रोहन कन्हाईने वेस्ट इंडीजच्या विजयामध्ये मोलाची भूमिका बजावली होती. तसेच 1979 मध्ये 30 वर्षीय क्लाइव्ह लॉइडने कॅरेबियन टीमला विजेतेपद मिळवून दिले होते. भारताच्या 1983 मधील विजयाला कोण विसरू शकेल? मोहिंदर अमरनाथ, सय्यद किरमानी आणि सुनील गावसकर हेच या विजयाचे खरे हीरो ठरले होते. या तिघांनीही वयाच्या 30 व्या वर्षीही संघाला विजय मिळवून दिला होता. संघाच्या विजयामध्ये ओल्डीने महत्त्वाची भूमिका बजावल्याची अनेक उदाहरणे आहेत. यात 1991-92 मध्ये पाकचा इम्रान खान आणि जावेद मियादाद, 1996 मध्ये र्शीलंकेचा रणतुंगा, 2003 आणि 2007 मध्ये ऑस्ट्रेलियाचा अँडम गिलख्रिस्ट आणि 2011 मध्ये भारताच्या सचिन तेंडुलकरचा समावेश आहे.

सीनियर खेळाडू अनिवार्य टीममध्ये असावेत, असे माझे मत नाही. मात्र, त्याचे महत्त्वदेखील कमी होऊ नये. मी असे म्हणत नाही की, घरच्या मैदानावर उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या खेळाडूंना संघामध्ये स्थान देण्यात येऊ नये. मात्र, वीरेंद्र सेहवाग आणि हरभजनकडे दुर्लक्ष केले जाऊ नये. संघामध्ये स्थान मिळवण्याची क्षमता या दोघांकडे आहे, तर त्यांची बांगलादेश आणि इंग्लंड दौर्‍यासाठी संघात निवड केली जायला हवी होती. इंग्लंड दौर्‍यासाठी 18 सदस्यीय भारतीय कसोटी संघ जाहीर झाला आहे. का या टीममध्ये सेहवाग आणि हरभजनला स्थान मिळाले नाही? टीम इंडिया दौर्‍यात इंग्लंडसोबत पाच कसोटी, पाच वनडे आणि दोन टी-20 सामने खेळणार आहे. या सामन्यांसाठी या दोघांनाही संधी देऊ शकले असते. यावरून या दोघांचे क्रिकेट करिअर किती शिल्लक राहिले हे सिद्ध होते. निवड झालेल्या टीममध्ये केवळ कर्णधार धोनी, गौतम गंभीर आणि ईशांत शर्मालाच इंग्लंडमध्ये खेळण्याचा अनुभव आहे.

अशातही संघामध्ये विदेशी खेळपट्टीवर चांगली कामगिरी करणार्‍या खेळाडूंची कमतरता आहे. युवा खेळाडू विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराने विदेशी खेळपट्टीवर चमकदार कामगिरी करून आपण कुठेही समाधानकारक खेळी करू शकतो हे सिद्ध केले आहे. मोठय़ा दौर्‍यांमध्ये आतापर्यंत अनुभवाची भूमिका अधिक महत्त्वपूर्ण ठरलेली आहे. माझ्या मते, निवड समितीचे काम केवळ संघाची निवड करणे एवढेच नाही, तर चांगले खेळणार्‍या जुन्या आणि नव्या खेळाडूंच्या संपर्कात राहणे हेदेखील आहे. तसेच निवड समितीने करावे. तसेच जे खेळाडू टीममधून बाहेर आहेत आणि टीममध्ये परत येऊ इच्छितात त्यांच्यासाठी पुनरागमनाची संधी उपलब्ध करून देण्याचे कामही निवड समितीचे आहे. माझ्या मते, वीरेंद्र सेहवाग आणि हरभजनला हेदेखील माहीत नसेल की आपण भारतीय क्रिकेटमध्ये कोठे आहोत? मात्र, ही फारच दु:खाची बाब आहे.