आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vishwanathan Anand Carlsen Seventh Match Ended In Equal

विश्वनाथन आनंद-कार्लसन सातवी लढत राहिली बरोबरीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - गतचॅम्पियन विश्वनाथन आनंदला नॉर्वेचा बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसनचे आव्हान अजूनही भेदता आलेले नाही. चेन्नईत सुरू असलेल्या जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये आनंद-कार्लसन यांच्यातील सातवा सामना सुद्धा बरोबरीत सुटला. सात फेर्‍यानंतर कार्लसन दोन गुणांसह आघाडीवर आहे.
सलग दोन सामन्यांत पराभव झाल्यानंतर आनंदकडून विजयी पुनरागमनाची आशा केली जात होती. मात्र, सातवी फेरी बरोबरीत सुटल्याने चाहत्यांची निराशा झाली आहे. नार्वेच्या कार्लसनने काळ्या सोंगट्याने खेळताना बर्लिन डिफेंसने सुरुवात केली. यामुळे त्याला सामना वाचवण्यात यश आले.
बारा सामन्यांच्या या स्पध्रेत आता फक्त पाच फेर्‍या शिल्लक असून नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन भारताच्या विश्वनाथन आनंदच्या तुलनेत आता 4.5-2.5 असा दोन गुणांनी आघाडीवर आहे. गुणांत बरोबरी मिळवण्यासाठी उर्वरित पाच सामन्यांपैकी भारताच्या खेळाडूला आता किमान दोन सामन्यांत विजय आवश्यक आहे.
अपेक्षेप्रमाणे निकाल नाही
या सामन्यात माझ्या बाजूने निकाल लागेल, अशी मला आशा होती. मात्र, तसे होऊ शकले नाही, अशी प्रतिक्रिया सामना संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना आनंदने व्यक्त केली. आता उर्वरित पाच सामन्यांत कार्लसनला तीन वेळा पांढर्‍या सोंगट्याने खेळण्याची संधी मिळणार आहे तर आनंदकडे फक्त दोन वेळा पांढर्‍या सोंगट्याने सुरुवात करण्याची संधी आहे. स्पध्रेतील आठवा सामना उद्या होईल.