बिलबाओ - पाच वेळचा वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन आनंदने स्पेनमधील बिलबाओ फायनल मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेला धडाकेबाज विजयाने सुरुवात केली. त्याने पहिल्या फेरीत साेमवारी माजी वर्ल्ड चॅम्पियन रुस्लान पोनोमारियोवचा पराभव केला. या राेमांचक विजयासह त्याने तीन गुणांची कमाई करून गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले. त्याने ६१ व्या चालीवर
आपला विजय नशि्चित केला.
येत्या नाेव्हेंबरमध्ये भारताच्या वशि्वनाथन आनंदचा सामना मॅग्नस कार्लसनविरुद्ध रंगणार आहे. या सामन्यापूर्वी ताे आपल्या शेवटच्या स्पर्धेत नशीब आजमावत आहे. त्याने धडाकेबाज विजयाने सुरुवात करताना कार्लसनविरुद्ध आगामी लढतीसाठी सज्ज असल्याचे संकेत दिले.