सोच्ची - पाच वेळचा वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन अानंदने मंगळवारी जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत पहिल्या विजयाची नोंद केली. त्याने स्पर्धेच्या तिस-या फेरीत नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनला धूळ चारली. यासह त्याने एका गुणांची कमाई केली.
सध्या स्पर्धेत दोन्ही तुल्यबळ खेळाडूंचे प्रत्येकी १.५ गुण झाले आहेत. दुस-या फेरीतील पराभवाची परतफेड करताना भारताच्या खेळाडूने दमदार पुनरागमन केले. यापूर्वी, कार्लसन आणि आनंद यांच्यातील सामना बरोबरीत सुटला होता. आता चौथ्या फेरीतील सामन्यावर सर्वांची नजर असेल. या लढतीत आनंद
आपली विजयी आघाडी कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची शक्यता आहे. याचे संकेत त्याने तिस-या फेरीतील लढतीदरम्यान, दिले. त्याने सुरुवात चांगली करून आपली लय शेवटपर्यंत कायम ठेवली. आता स्पर्धेतील एकूण नऊ फे-यातील लढती शिल्लक आहेत.