आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
विक आन झी - वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन आनंदने रविवारी टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेच्या 11 व्या फेरीत हॉलंडच्या इर्विन लॉएमीवर मात केली. या विजयासह आनंदने गुणतालिकेत संयुक्तपणे दुस-या स्थानी धडक मारली. भारतीय खेळाडूचा हा स्पर्धेतील चौथा विजय ठरला.
आता केवळ दोन फे -या शिल्लक आहेत. दुसरीकडे नार्वेच्या कार्लसनने अमेरिकेच्या हिकारू नाकामुराला नमवून 9.5 गुणांसह अव्वलस्थान कायम ठेवले. हंगेरीचा पीटर लेको व रशियाचा कर्जेकिनने सात गुणांसह संयुक्तपणे चौथे स्थान पटकावले. या स्पर्धेत प्रथमच सहभागी झालेल्या भारताचा पी. हरिकृष्णाने सहा गुणांची कमाई करत सातवे स्थान गाठले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.