आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vishwanathan, Karlson Fighting In Chennai For The World Championship

विश्वनाथन, कार्लसन यांच्यात रंगणार विश्व अजिंक्यपदासाठीची लढत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - येत्या नोव्हेंबर महिन्यात चेन्नई येथे भारताचा विश्वनाथन आनंद आणि नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन यांच्यात विश्व अजिंक्यपदासाठीची लढत होणार आहे. या लढतीकडे संपूर्ण बुद्धिबळ विश्वाचे लक्ष लागलेले आहे. या लढतीत नेमके काय होणार याबाबत भारताच्या दोन महान बुद्धिबळपटू आणि प्रशिक्षक प्रवीण ठिपसे यांनी रविवारी मुंबईत अंदाज व्यक्त केला.


भारताचे ग्रँडमास्टर आणि आनंदबरोबर खेळण्याचा अनुभव असलेले प्रवीण ठिपसे म्हणाले,
गुणवत्ता, अनुभव याचा विचार केला तर ‘मास्टर’ म्हणजे आनंद सहज जिंकायला हवा, परंतु बुद्धिबळ या खेळात ‘स्ट्रीट फायटर्स’ची ओळख वेगळीच आहे. स्ट्रीट फायटर्स कधी कुणाला थक्क करतील, धक्का देतील हे सांगता येत नाही. चेन्नईची विश्वविजेतेपदाची लढत ‘डल’ किंवा संथ होणार नाही. सुरुवातीला आघाडी घेणारा खेळाडू बाजी मारेल. चेन्नईत खेळत असल्याचा फायदा आनंदला फारसा मिळणार नाही. उलट त्याच्यावर आपल्या देशवासीयांचे, त्याच्या हितचिंतकांचे, अपेक्षांचे दडपण अधिक येईल.


आनंद प्रथमच वर्ल्ड नंबर वनसमोर- गोखले
पाच वेळचा वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन आनंद विश्वविजेतेपदाच्या लढतीत प्रथमच वर्ल्ड नंबर वनच्या समोर आला आहे. ही प्रतिष्ठेची लढत कुणीही जिंकली तरी कुणाचेही आर्थिक नुकसान होणार नाही, उलट फायदाच अधिक होईल. डॉलर्सच्या तुलनेत भारतीय रुपया गडगडल्यामुळे आनंदचा फायदाच होणार आहे, असे द्रोणाचार्य पुरस्कार विजेते प्रशिक्षक रघुनंदन गोखले म्हणाले.