आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Viswanathan Anand Said I Will Play Well Play, Divya Marathi

योजनाबद्ध पद्धतीने खेळणार : विश्वनाथन आनंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत गेल्या वर्षी मला पराभव स्वीकारावा लागला होता. या वर्षीही माझी लढत पुन्हा त्याच्याबरोबरच आहे. मात्र, यंदा मी अधिक वेगळ्या आणि योजनाबद्ध पद्धतीने खेळणार आहे, असे मनोगत माजी विश्वविजेता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद याने येथे व्यक्त केले.

लीग फॉरमॅटमुळे बुद्धिबळ या खेळाचा अधिक विकास होईल. त्याला लोकप्रियता मिळेल आणि युवा, बुद्धिमान खेळाडू पुढे येतील, त्यांना आपली गुणवत्ता प्रकाशात येण्यासाठी एक व्यासपीठ मिळेल, या भूमिकेने संघ खरेदी केली आहे, असे आनंदने स्पष्ट केले. भारतीय महिलाही टॅलेंटमध्ये अजिबात कमी नाहीत, पण त्यांना आजवर जागतिक पातळीवर अपेक्षित कामगिरी करून दाखवता आलेली नाही. कोनेरू हंपीनंतर कुणीही खेळाडू जागतिक स्तरावरही खेळू शकलेली नाही, याकडे आनंदने लक्ष वेधले.