आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेटमधून निवृत्ती घेण्‍यास लक्ष्‍मणचा स्‍पष्‍ट नकार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पर्थ- परदेशी दौ-यावर सातत्‍याने अपयशी ठरत असलेल्‍या व्‍हीव्‍हीएस लक्ष्‍मणने सध्‍या कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्‍याचा विचार नसल्‍याचे स्‍पष्‍ट केले आहे. निवृत्त होण्‍याचा जेव्‍हा निर्णय घेईन तेव्‍हा त्‍याची माहिती सगळयांना देईल, असे त्‍याने म्‍हटले.

इंग्‍लंड दौ-यापाठोपाठ टीम इंडियाचा ऑस्‍ट्रेलिया दौ-यात 3-0 ने पराभव झाल्‍यानंतर संघातील वरिष्‍ठ खेळाडूंवर मोठया प्रमाणात टीका करण्‍यात येत आहे. भारतीय संघाच्‍या माजी खेळाडूंकडून आणि क्रिकेट तज्‍ज्ञांकडून 'या' खेळाडूंना वगळण्‍याची सातत्‍याने मागणी होत आहे. लक्ष्‍मणला ऑस्‍ट्रेलिया दौ-यातील सहा डावांमध्‍ये 17 च्‍या सरासरीने 102 धावा करता आल्‍या. या दौ-यात त्‍याने फक्‍त एक अर्धशतक केले. मागील वर्षी झालेल्‍या इंग्‍लंड दौ-यातही त्‍याचा फॉर्म हरपला होता. तेथील चार कसोटी सामन्‍यात त्‍याने 182 धावा बनवल्‍या होत्‍या. सातत्‍याने धावा काढण्‍यात अपयशी ठरत असल्‍यामुळे टीकेचा धनी बनलेल्‍या लक्ष्‍मणने निवृत्तीबाबत आपले कुठलेच नियोजन नसल्‍याचे म्‍हटले.
होय, मी पराभवाची जबाबदारी स्वीकारतो- धोनी
वरिष्‍ठांबद्दलचा निर्णय अतिशय काळजीपूर्वक घ्‍यायला हवाः धोनी
कर्णधार धोनी घेणार कसोटी क्रिकेटचा संन्‍यास?