आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wahab Riyaz Makes Worst ODI Bowling Record For Pakistan

एक वर्षांनंतर परतला हा पाकिस्‍तानी... अन् जुना विक्रम मोडून बनला \'No.1\'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्‍तानच्‍या वहाब रियाजने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्‍या वनडे सामन्‍यात सुमार कामगिरी करून एक अनोखा विक्रम आपल्‍या नावे केला.

वहाबने एका वर्षांनंतर वनडे टीममध्‍ये पुनरागमन केले होते. चांगल्‍या कामगिरीच्‍या जोरावर संघात दमदार प्रदर्शन करेल असा ठाम विश्‍वास त्‍याला होता. मात्र, त्‍याच्‍या नशीबात काही वेगळेच होते.

दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्‍या वांडरर्स स्‍टेडिअममध्‍ये झालेल्‍या तिस-या वनडेमध्‍ये 2 विकेट घेण्‍यासाठी त्‍याने 93 धावा मोजल्‍या होत्‍या. वहाबने यापूर्वी 18 मार्च 2012 रोजी त्‍याने शेवटचा वनडे खेळला होता. त्‍यामध्‍ये त्‍याने अवघ्‍या 4 षटकांत 50 धावा दिल्‍या होत्‍या. त्‍याच्‍या या खराब कामगिरीमुळे त्‍याला वर्षभर संघाबाहेर बसावे लागले. जेव्‍हा त्‍याला द.आफ्रिकेविरूद्ध खेळण्‍याची संधी मिळाली तेव्‍हा त्‍याने एकदम वाईट विक्रम आपल्‍या नावे केले.

पाकिस्‍तानकडून इतक्‍या धावा देणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला. त्‍याने नावेद उल हसनचा सहा वर्षांपूर्वीचा जुना विक्रम मोडून त्‍यावर आपल्‍या नावाची नोंद केली. नावेदने 4 फेब्रुवारी 2007 रोजी दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्‍याच सामन्‍यात 8 षटकांत 92 धावा दिल्‍या होत्‍या.

10 वर्षे जुना विक्रम मोडला

सर्वात सुमार पाकिस्‍तानी गोलंदाज बनण्‍याबरोबरच वहाबने नामबियाचा गोलंदाज आर वान व्‍यूरेनचा 10 वर्षे जुना विक्रमही मोडला. व्‍यूरेनने 27 फेब्रुवारी 2003 रोजी ऑस्‍ट्रेलियाविरूद्ध झालेल्‍या वनडेमध्‍ये 92 धावा दिल्‍या होत्‍या.

पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या गोलंदाजीमध्‍ये शतक ठोकलेल्‍या खेळाडूंविषयी...