आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wankhede Wicket Is Sporting Says Curator Sudhir Naik

वानखेडेची खेळपट्टी स्पोर्टिंग - नाईक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी नेहमीच फलंदाज व गोलंदाज यांना समान संधी देणारी असते. या वेळीही ती तशीच असेल. या खेळपट्टीवर चेंडू बॅटवर चांगल्या वेगात येईल. त्यामुळे फटकेबाज फलंदाजांना यावर चांगली संधी आहे,अशी माहिती सुधीर नाईक यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.

त्यांनी वानखेडे स्टेडियमवर खेळपट्टी तयार केली आहे. ‘चेंडूला या खेळपट्टीवर चांगली उसळी मिळेल तसेच चेंडू वेगातही जाईल. त्यामुळे गोलंदाजांनाही या खेळपट्टीवर तेवढीच संधी असेल. मात्र खेळपट्टी व्यवस्थित रोल करण्यात आल्यामुळे फिरकी गोलंदाजांना फारशी संधी मिळणार नाही. त्यामुळे या खेळपट्टीवर दर्जेदार फलंदाज असणार्‍या संघाला 160 ते 170 धावसंख्या सहज उभारता येईल. धावसंख्येचा पाठलाग करणार्‍या संघालाही ही धावसंख्या गाठण्याची संधी आहे,’ असेही ते म्हणाले.

गोलंदाजांनाही येथे अनुकूल परिस्थिती असेल. फिरकीपेक्षा वेगवान गोलंदाजांसाठी येथील वातावरण अधिक मदतीचे ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.