आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सराव सामने: इंग्लंड, आफ्रिका विजयी ! वेस्ट इंडीज, श्रीलंका, बांगलादेशचा वेगवेगळ्या लढतीत पराभव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी - विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपूर्वी आयोजित सराव सामन्यात सोमवारी इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तानने विजय मिळवून आपला संघ स्पर्धेसाठी सज्ज असल्याचे संकेत दिले आहेत. दुसरीकडे या सराव लढतीत वेस्ट इंडीज, श्रीलंका आणि बांगलादेशला पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंडने वेस्ट इंडीजला ९ विकेटने धुतले. पावसाचा व्यत्यय असलेल्या सामन्यात डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेला ५ विकेटने हरवले, तर रोमांचक सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशला ३ विकेटने पराभूत केले.

पाकिस्तानच रोमांचक विजय : सिडनीत बांगलादेशने पाकविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना ४९.५ षटकांत सर्वबाद २४६ धावा काढल्या. त्यांच्याकडून सलामीवीर तामिम इक्बालने ८१ आणि मोहम्मुदुल्लाहने ८३ धावा ठोकल्या. सकिब-अल-हसनने ३१ धावांचे योगदान दिले. पाककडून मो. इरफानने ५२ धावांत ५ गडी बाद केले. यासिर शाहने दोघांना िटपले. प्रत्युत्तरात पाकची सुरुवात चांगली झाली नाही. दोन्ही सलामीवीर ८ धावांत परतले. युनिस खानने २५ तर हॅरिस सोहेलने ३९ धावांचे योगदान दिले. पाक संघ ४ बाद १०३ धावा असा संकटात सापडला होता. सोहेब मकसूदने नाबाद ९३ धावा आणि अकमलच्या ३९ धावांच्या बळावर पाकने विजय खेचून आणला.

इंग्लंड विजयी; वोग्स चमकला
सिडने येथे झालेल्या सराव लढतीत विंडीजचा अवघ्या २९.३ षटकांत १२२ धावांत खुर्दा उडाला. वेस्ट इंडीजकडून सलामीवीर डेवेन स्मिथ (२१), मार्लोन सॅम्युअल्स (१०), एल. सिमन्स (४५) आणि डॅरेन सॅमी (१२) यांनाच दोन अंकी धावसंख्या काढता आली. इंग्लंडकडून वेगवान गोलंदाज क्रिस वेाग्सने १९ धावांत ५ गडी बाद केले. फिनने २, जॉर्डन, रवी बोपरा आणि ट्रेडवेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. प्रत्युत्तरात इंग्लंडने २२.५ षटकांत १२५ धावा काढून ९ गड्यांनी दणदणीत विजय मिळवला. इंग्लंडकडून इयान बेलने नाबाद ३५, जे. टेलरने नाबाद २५ धावा काढल्या.

आफ्रिकेच्या विजयात डी. कॉकचे अर्धशतक
हेडिंग्ले ओव्हल येथील सराव लढतीत आफ्रिकेने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतले. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकेसारख्या मजबूत गोलंदाजीविरुद्ध ४४.४ षटकांत ७ बाद २७९ धावा काढल्या. लंकेकडून सलामीवीर अनुभवी तिलकरत्ने दिलशानने १२२ चेंडूंत १५ चौकार, २ षटकारांसह १०० धावा काढल्या. संगकाराने ३१, करुणारत्नेने ४६ तर कर्णधार मॅथ्यूजने ५८ धावांचे योगदान दिले. पावसामुळे लंकेचा डाव ४४.४ षटकांचा होऊ शकला. नंतर द. आफ्रिकेपुढे डकवर्थ लुईस नियमानुसार २५ षटकांत १८८ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले. आफ्रिकेने ३ चेंडू शिल्लक ठेवून हे लक्ष्य गाठले. सलामीवीर हाशिम आमलाने ४० चेंडूंत ४६ तर क्विंटन डी. कॉकने ५५ चेंडूंत ६६ धावा ठोकल्या.