आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सराव सामने: द. आफ्रिकेची 134 धावांनी हार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ख्राइस्टचर्च - विश्वविजयाचा प्रबळ दावेदार समजला जाणा-या द.आफ्रिकन संघाला सराव सामन्यात १३४ धावांनी पराभव पत्कारावा लागला. यजमान न्यूझीलंडने त्यांना पाणी पाजले. पहिल्या सराव सामन्यात झिम्बाब्वेविरुद्ध संघर्ष करणारा यजमान संघ बुधवारी मात्र कात टाकल्यासारखा खेळला. प्रथम फलंदाजी करताना ८ गडी गमावून ३३१ धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर पाहुण्या संघाला ४४.२ षटकांत १९७ धावांतच गारद केले. विश्वचषकात न्यूझीलंडचा सलामीचा सामना शनिवारी श्रीलंकेविरुद्ध होणार आहे.

श्रीलंकेला मसकदजाचा मार
लिनकोन | झिम्बाब्वेने सराव सामन्यात अकल्पनीय विजयाची नोंद करून आम्हाला दुबळे समजू नका, असा इशाराच जणू दिला आहे. बुधवारी श्रीलंकेला २८ चेंडू आणि ७ गडी राखून पराभवाचा हादरा दिला. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत २७९ धावा केल्या त्या ८ गड्यांच्या मोबदल्यात. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेने ४५.३ षटकांत अवघे ३ मोहरे खर्चून २८१ धावा काढून दाखवल्या. विजयाचा शिल्पकार ठरला हॅमिल्टन मसकदजा. ११९ चेंडूत ११७ धावांची अविस्मरणीय खेळी त्याने साकारली.

ऑस्ट्रेलियाने यूएईला चिरडले
मेलबर्न |ऑस्ट्रेलियाने विश्वचषकातील दावेदारी सराव सामन्यात पेश केली. संयुक्त अरब अमिरातीला (यूएई) १८८ धावांनी चिरडले. आधी ८ गडी गमावून ३०४ धावा उभ्या केल्या. त्यानंतर दुबळ्या यूएईला ३०.१ षटकांत ११६ धावांवरच गुंडाळले. कर्णधार मायकल क्लार्क तंदुरुस्त असल्यामुळे कांगारू आनंदले आहेत.

मिसबाहमुळे पाक विजयी
सिडनी | कर्णधार मिस्बाह उल हक (ना.९१) च्या शानदार फलंदाजीमुळे पाकिस्तानने इंग्लंडविरुद्ध रोमहर्षक विजयाची नोंद केली. साहेबांनी प्रथम फलंदाजी करताना ८ गडी गमावून २५० धावा केल्या. पाकिस्तानने ४८. ५ षटकांत ६ गडी गमावून हे आव्हान गाठले. या विजयामुळे पाकिस्तानचा आत्मविश्वास वाढला आहे.