Home »Sports »From The Field» Warne, Samuels In Ugly T20 Bust-Up

शेन वॉर्नने मर्यादा ओलांडून केली शिवीगाळ, एका सामन्‍याची बंदी

वृत्तसंस्‍था | Jan 07, 2013, 13:29 PM IST

  • शेन वॉर्नने मर्यादा ओलांडून केली शिवीगाळ, एका सामन्‍याची बंदी

मेलबोर्न- ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटीपटू आणि लेग स्पिनचा सम्राट शेन वॉर्न पुन्‍हा एकदा मैदानावरील वागणुकीमुळे चर्चेत आला आहे. त्‍याने बिग बॅश लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेतील रविवारच्या सामन्यात वेस्ट इंडिजच्या मार्लन सॅम्युअल्ससोबत वाद घातला आणि त्‍याला शिवीगाळ केली. याप्रकरणी सामनाधिका-यांनी त्‍याला दोषी ठ‍रविले असून त्‍याच्‍यावर एका सामन्‍याची बंदी घालण्‍यात आली आहे. तसेच 4700 डॉलर्स एवढा दंडही ठोठावण्‍यात आला आहे.

बिग बॅश स्पर्धेत रविवारी मेलबर्न स्टार्स आणि रेनीगेड्स यांच्यात सामना झाला. त्यावेळी मेलबर्न स्टार्स संघाचा कर्णधार असलेल्या वॉर्नचा सॅम्युअल्सशी वाद झाला. वॉर्नने सॅम्युअलला उद्देशून अपशब्द उच्चारले. तसेच त्‍याच्‍या छातीवर चेंडुही जोरात फेकला. यावरुन दोघांमध्‍ये चांगलीच शाब्दिक चकमक उडाली होती. वॉर्नने चेंडु फेकल्‍यानंतर सॅम्‍युअल्‍सने बॅट त्‍याच्‍या दिशेने हवेत भिरकाविली होती. सुदैवाने बॅट कोणाला लागली नाही. वॉर्नने सर्वप्रथम शिक्षा जास्‍तीच कठोर असल्‍याचे ट्विट केले होते. परंतु, नंतर त्‍याने शिक्षा मान्‍य केली. वर्तणूकही चुकीची असल्‍याचे त्‍याने मान्‍य केले. मर्यादा ओलांडल्‍याचे वॉर्न म्‍हणाला.

शेन वॉर्न यापुर्वीही अनेक वेळा मैदानावरील वर्तणुकीमुळे वादात अडकला होता. दरम्‍यान, याप्रकरणी सॅम्‍युअल्‍सबाबत सुनावणी अद्याप व्‍हायची आहे. तो जायबंदी झाला आहे. परंतु, त्‍यालाही शिक्षा होऊ शकते.

Next Article

Recommended