आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Warne To Be Inducted Into ICC Cricket Hall Of Fame

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयसीसी क्रिकेट हॉल ऑफ फेममध्‍ये शेन वॉर्नचा समावेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई- ऑस्‍ट्रेलियाचा माजी लेगस्पिनर शेन वॉर्नचा आंतरराष्‍ट्रीय क्रिकेट कौन्सिलने (आयसीसी) हॉल ऑफ फेममध्‍ये समावेश केला आहे. लॉर्ड्स येथे 19 जुलै रोजी होणा-या इंग्‍लंड आणि ऑस्‍ट्रेलिया कसोटीच्‍या चहापानावेळी हॉल ऑफ फेममध्‍ये समावेश केला जाईल. आयसीसीने गुरूवारी याची घोषणा केली.

हॉल ऑफ फेममध्‍ये सामील होणारा वॉर्न 69वा पुरूष सदस्‍य आहे. आयसीसीने 2012-13मध्‍ये वेस्‍ट इंडीजचा ब्रायन लारा, इंग्‍लंडचा एनिड बेकवेल आणि ऑस्‍ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मॅकग्राथ यांचा हॉल ऑफ फेममध्‍ये समावेश केला होता. यावर्षी या यादीत जागा मिळवणारा वॉर्न चौथा खेळाडू ठरला आहे.

वॉर्नने 1992 ते 2007 दरम्‍यान खेळल्‍या गेलेल्‍या 147 कसोटीत ऑस्‍ट्रेलियाचे प्रतिनिधीत्‍व करताना 25.41च्‍या सरासरीने 708 विकेट घेतल्‍या आहेत. 700 विकेट घेणारा तो पहिलाच क्रिकेटपटू होता.

त्‍याने 194 वनडे सामन्‍यातून 293 विकेट पटकाविल्‍या आहेत. 1999 सालच्‍या विश्‍वचषकातील लॉर्ड्सवर झालेल्‍या अंतिम फेरीत पाकिस्‍तानविरूद्धच्‍या सामन्‍यात विजय मिळवण्‍यात त्‍याची भूमिका महत्‍वाची होती.