आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Warner Axed After Unprovoked Attack On England Player

हाणामारी करणे वॉर्नरला पडले महागात, न्‍यूझीलंडविरूद्धच्‍या सामन्‍यातून बाहेर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबर्न- ऑस्‍ट्रेलियाचा आक्रमक डावखुरा फलंदाज डेव्हिड वॉर्नरला मैदानाबाहेरील हाणामारी करणे चांगलेच महागात पडले आहे. इंग्‍लंडच्‍या खेळाडूला त्‍याने मारहाण केल्‍यामुळे आजच्‍या (बुधवार) न्‍यूझीलंडविरूद्धच्‍या सामन्‍यातून बाहेरचा रस्‍ता दाखवण्‍यात आला असून त्‍याला ऑस्‍ट्रेलियात परत येण्‍यास सांगितले आहे.

ज्‍यो रूट या इंग्लिश खेळाडूला वॉर्नरने हाणामारी केल्‍याचे बोलले जाते. क्रिकेट ऑस्‍ट्रेलियाच्‍या आचारसंहितेच्‍या उल्‍लंघन अहवालानंतर डेव्हिड वॉर्नरला न्‍यूझीलंडविरूद्धच्‍या सामन्‍यातून हटवण्‍यात आले आहे.

वॉर्नरवर नियम सहाचे उल्‍लंघन केल्‍याप्रकरणी ही कारवाई करण्‍यात आली. रविवारी इंग्‍लंड आणि ऑस्‍ट्रेलिया यांच्‍यात बर्मिंगहम येथे सामना झाला होता. त्‍यावेळी झालेला वाद हाणामारीपर्यंत पोहोचला होता. इंग्‍लंड क्रिकेट मंडळाने यावर आपले निवेदन जारी केले होते. मात्र, त्‍यांनी खेळाडू रूटचे नाव जाहीर केले नव्‍हते. वॉर्नरने विनाकारण त्‍याच्‍यावर हल्‍ला केला. इंग्‍लंडने ऑस्‍ट्रेलियाचा 48 धावांनी पराभव केला होता. सामन्‍यानंतर वॉर्नर दारूच्‍या नशेत होता. ही घटना एका बारमध्‍ये घडली होती. वॉर्नरनेही आपल्‍याकडून चूक झाली असल्‍याचे कबूल केले आहे. तसेच या घटनेबद्दल त्‍याने संबंधित खेळाडूची माफीही मागितली आहे. इंग्‍लंडच्‍या व्‍यवस्‍थापनाने केलेल्‍या चौकशीत ज्‍यो रूटची काहीही चूक नसल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे.