फोटो - शिखर धवनशी वाद घालताना डेव्हीड वॉर्नर
अॅडिलेड - आतापर्यंत शांततेत सुरू असलेल्या सामन्यात पहिल्यांदान वाद झाल्याचे चित्र सामन्याच्या चौथ्या दिवशी दिसून आले. मैदानावर डेव्हीड वॉर्नर आणि शिखर धवन यांच्यात चांगलाच वाद झाला. दोघांमधील वाद एवढा वाढला होता की, अखेर पंचांना मध्यस्थी करून हा वाद सोडवावा लागला.
नोबॉलमुळे झाला वाद
ऑस्ट्रेलियाच्या दुस-या डावाची फलंदाजी सुरू असताना 34 व्या षटकात हा वाद पाहायला मिळाला. वरुण आरोनने सलामीवीर डेव्हीड वॉर्नरला क्लीन बोल्ड केले. त्याचा उत्साह साजरा केला, पण पंचांनी नोबॉल चेक करत चेंडू चुकीचा ठरवला. वॉर्नर बाद झाल्याचे समजून चौकाराच्या सीमेपर्यंत पोहोचला होता, पण नोबॉल ठरल्यामुळे पंचांनी त्याला परत फलंदाजी करण्यासाठी बोलावले. वॉर्नर परतताना आरोनला शांत राहा, असे बोलला. त्यावर शिखर धवनला राग आणि त्याने वॉर्नरबरोबर वाद घातला. त्यानंतर पंचांनी मध्यस्थी करून दोघांना बाजुला केले.
पुढील स्लाइड्सवर पाहा, वादाचे PHOTO