आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलामी सामन्यात रंगला वाद; वॉर्नरला सामना निधीच्या ५० टक्के रकमेची कपात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न - भारताचा सलामीचा फलंदाज रोहित शर्मा याच्याशी घातलेल्या अनावश्यक वादाबद्दल ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याच्या सामना शुल्कापैकी ५० टक्के रकमेचा दंड आकारण्यात आला आहे. मात्र, वॉर्नरने मी रोहितला ‘इंग्रजीत बोल’ असे म्हटल्याचे समितीसमोर दिलेल्या जबाबात म्हटले आहे.

सामन्याच्या २३ व्या षटकात झालेल्या प्रकाराबद्दल एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तो बोलत होता. एका ओव्हरथ्रोवर रोहित जेव्हा धाव घेण्यासाठी पळाला, त्या वेळी हा प्रकार घडला. क्षेत्ररक्षकाने चेंडू यष्टिरक्षकाकडे फेकल्यानंतर तो चुकून फलंदाजाला लागला, तर त्याने धाव घेण्यासाठी पळायचे नसते, असा सामान्य संकेत आहे. मात्र, रोहितने धाव काढल्यानंतर त्याच्याशी काही अन्य खेळाडू बोलत असताना मीदेखील बोलायला गेलो. तेव्हा तो हिंदीत काहीतरी बोलला, असेही वॉर्नरने सांगितले.

जॉर्ज बेलीचे निलंबन
भारताविरुद्धच्या सामन्यात षटकांची गती कमी राखल्याबद्दल ऑस्ट्रेलियाचा कप्तान जॉर्ज बेली याला एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे तो इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात खेळू शकणार नाही. तसेच बेलीला सामना शुल्कापैकी २० टक्के कपात, तर अन्य सहका-यांच्या सामना शुल्कातून १० टक्के कपात करण्यात येणार आहे. त्यामुळे इंग्लंडविरुद्ध सामन्यात ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व स्मिथकडे जाण्याची शक्यता आहे.