आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वासिम अक्रमने उडवली भारतीय संघातील वरिष्‍ठांची थट्टा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऍडि‍लेड- ऑस्‍ट्रेलिया दौ-यातील पराभवामुळे टीकेचे धनी बनलेल्‍या टीम इंडियावर आता पाकिस्‍तानी खेळाडूंनी निशाणा साधला आहे. पाकिस्‍तानचा माजी कर्णधार वासिम अक्रमने भारताच्‍या वरिष्‍ठ खेळाडूंवर टीकास्‍त्र सोडले आहे. भारतीय खेळाडूंचे वय वाढल्‍याने त्‍यांच्‍या शाररिक हालचाली मंदावल्‍याचे त्‍याने म्‍हटले.

पर्थ आणि सिडनी कसोटीमध्‍ये भारतीय खेळाडू किती तंदुरूस्‍त आहेत हे दिसून आले आहे. इथल्‍या गरम वातावरणात खेळाडूच्‍या क्षमतेचा कस लागतो. भारतीय संघातील तीन वरिष्‍ठ खेळाडू तर सलग दोन दिवस क्षेत्ररक्षण केल्‍याने कमालीचे थकलेले दिसून आले. ते इतके थकलेले होते की, त्‍यांना आपला पाय सुद्धा हलवता येत नव्‍हता आणि वळणा-या चेंडूचा सामना देखील त्‍यांना करता येत नव्‍हता. त्‍यामुळे भारतीय संघातील थकलेल्‍या वरिष्‍ठ खेळाडूंनी घरी बसावे असेच त्‍याने अप्रत्‍यक्षरित्‍या सांगितले आहे.
तिवारीच्‍या \'त्‍या\' कॅचने पालटला सामन्‍याचा नूरच, पाहा व्हिडिओ...
... \'त्‍या\' धावेमुळे जयवर्धने ठरला कमनशिबी