महेंद्रसिंह धोनीचा खास मित्र सुरेश रैनालाही त्याच्याप्रमाणेच शौक आहे. धोनीचा जीव बाईक्सवर तर रैनाला नव्या आणि अत्याधुनिक कार आकर्षित करतात.
आपला हाच शौक पूर्ण करण्यासाठी रैनाने मे 2013मध्ये
पोर्शची लिमिटेड एडिशन बॉक्सटर कार खरेदी केली. हे नवे मॉडेल घेण्यासाठी त्याला लाखो रूपये खर्च करावे लागले होते.
या कारची किंमत 27 लाख रूपये असून ती भारतात आणण्यासाठी रैनाला ड्युटी टॅक्सच्या रूपात भरपूर रक्कम द्यावी लागली.
दोन दिवसांच्या प्रयत्नानंतर रैना आपली आवडती कार जेव्हा घरी घेऊन आला. तेव्हा सर्वजण पाहतच राहिले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रैनाने
टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीला पहिला राऊंड दिली. त्यानंतर त्याने आयपीएल टीम चेन्नई सुपरकिंग्जच्या सहका-यांना दिली.