आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wave World Kabbadi League News In Marathi, Divya Marathi

वेव्ह वर्ल्ड कबड्डी लीग: पंजाबची कॅलिफोर्नियावर मात, फायनल आता लाहोरमध्ये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बर्मिंगहॅम - पंजाब थंडर्सने वेव्ह वर्ल्ड कबड्डी लीगमध्ये रविवारी कॅलिफोर्निया एंजेल्सचा पराभव केला. या संघाने 65-48 अशा फरकाने सामना जिंकला. याशिवाय पंजाबने स्पर्धेतील आपली विजयी मोहीम कायम ठेवली. या लढतीत चमकदार कामगिरी करणारा यादविंदर सिंग सामनावीरचा मानकरी ठरला. पंजाबकडून सरबजितसिंगने शानदार खेळी करून 20 गुणांची कमाई केली.

वेव्ह वर्ल्ड कबड्डी लीगची फायनल आता लाहोरमध्ये रंगणार आहे. यापूर्वी हा सामना मोहालीत होणार होता. मात्र, राजकीय वातावरणामुळेच या वेळापत्रकात नव्याने बदल करण्यात आल्याचे कबड्डी लीगच्या आयोजकांनी स्पष्ट केले

मुंबईची संधी हुकली
लीगचा अंतिम सामना मुंबईत होणार होता. मात्र, पाकचे खेळाडू लीगमध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळेच या ठिकाणी वादाचे वातावरण निर्माण होऊ शकेल याचा विचार करूनच आयोजकांनी या अंतिम सामन्याचे मुंबईतील आयोजन रद्द केले आहे.