आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नदालला हरवू शकतो असे वाटले नव्हते : वावरिंका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबर्न - ‘जगातील नंबर वन राफेल नदालला पराभूत करण्याची आशा स्वप्नातदेखील नव्हती,’ अशा शब्दांत ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन स्टॅनलिस वावरिंकाने प्रांजळ प्रतिक्रिया व्यक्त केली. रविवारी पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात स्विसच्या वावरिंकाने स्पेनच्या राफेल नदालवर मात केली.

‘मला आता हे सर्व काही स्वप्नवत वाटत आहे. माझ्यासाठी हा वेगळा अनुभव आहे. मी अनेक फायनल्स पाहिल्या आहेत. अव्वल खेळाडू खेळतात ती ग्रँडस्लॅमची फायनल पाहण्याचा मी नेहमी प्रयत्न केला. नदालवर माझा विजय मोठेच यश आहे,’ असेही तो म्हणाला.

फायनलमध्ये काय झाले?
रविवारी झालेल्या पुरुष एकेरीच्या फायनलमध्ये स्विसच्या वावरिंकाने बाजी मारली. त्याने स्पेनच्या राफेल नदालला चार सेटपर्यंत रंगलेल्या सामन्यात 6-3, 6-2, 3-6, 6-3 अशा फरकाने पराभूत केले. त्याने दोन तास 21 मिनिटांत सामना जिंकला. त्याचे करिअरमधील हे पहिले ग्रँडस्लॅम ठरले.