आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्‍वचषक 2015 : या वेळी ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्ट्या भारतासारख्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय खेळपट्ट्यांवर ३०० चा स्कोअर होणे किंवा धावांचा पाठलाग करून तो गाठणे, यात काहीच नवे नाही. नेहमी असेच असे होते. मात्र, गोलंदाजांसाठी प्रसिद्ध असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्ट्यांवरही असेच दिसू शकेल. कारण, या वेळी ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्या १९९२ मध्ये होत्या तशा घातक आणि वेगवान नाहीत. त्यांच्यावर तसे गवत नाही, जसे त्या वेळी होते. शिवाय बदललेल्या नियमामुळेसुद्धा मोठे स्कोअर होतील. खेळण्याच्या शैलीतही बदल झाला आहे.

ऑस्ट्रेलियात १९९२ चा वर्ल्डकप आणि २०१४ मध्ये झालेल्या वनडे सामन्यांची तुलना अत्यंत रोचक आहे. विश्वचषकात एकदाही ३०० धावा झाल्या नव्हत्या. एकदासुद्धा २५० धावांचे लक्ष्य गाठणे शक्य झाले नाही. संघांना फक्त सहा वेळा २५० चा आकडा गाठता आला. मात्र, २०१४ मध्ये पाच वेळा २७० पेक्षा मोठा स्कोअर कमी पडला. एक वेळा तर ३०१ धावांचे लक्ष्यही गाठले गेले.
पुढील स्‍लाइडवर वाचा, वेगाने धावा होण्‍याची कारणे