आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • WC : Dhoni Could Not Take The Stump With Himself In India Pak Cricket Match

माहीचा \'हिरमोड\', पाकवर विजय मिळविल्‍यानंतर नाही घेता आल्‍या बेल्‍स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न : विश्‍वचषकात पा‍रंपरिक प्रतिस्‍पर्धी पाकिस्‍तानवर दणदणीत विजय मिळविल्‍यानंतर सवयीप्रमाणे धोनीने स्टम्प्सवरील बेल्स उचलल्‍या. परंतु, स्क्वेअर लेगवर असलेले पंच इयान गुल्ड यांनी धोनीकडून ही बेल्स परत घेतली आणि पुन्हा स्टम्पस्वर ठेवली. बेल्‍स सोबत घेऊन जाता आल्या नसल्‍याने माही निराश झाला होता.
(फाइल फोटो - टीम इंडियाचा कर्णधार धोनी, 2011 चा विश्‍वचषक जिंकल्‍यानंतर स्‍टंप्‍स घेवून युवीसाेबत आनंद व्‍यक्‍त करताना)
आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या 'विश्‍वचषक 2015' मध्‍ये एलईडी स्टम्पचा उपयोग करण्यात येत आहे. खेळाडू क्‍लीन बोल्‍ड झाला किंवा स्टम्पला हात लागला तर त्या चमकायला लागतात. हे स्टम्प खूपच सेन्सेटिव आहेत, तसेच बेल्स पडल्यावर ब्लिंक होतात. धोनीने आनंदाच्या बहरात बेल्स उचलली, पंच इयान गुल्‍ड यांनी समजावल्‍यानंतर त्‍याने बेल्‍स परत केली.
स्‍टंप्‍सचा सेट 24 लाख रंपयांचा
एलईडी स्‍टंप्‍सचा सेट 40 हजार डॉलरला (अंदाजे 24 लाख रुपये) मिळतो. दोन बेल्सची किंमत पन्नास हजार रुपये आहे. त्यामुळेच आयसीसीची मंजुरी असल्याशिवाय कोणासही स्‍टंप्‍स किंवा बेल्स विजयाची स्‍मृती म्‍हणूण सोबत नेता येणार नाही.
पुढील स्‍लाइडवर पाहा, विश्‍वचषक 2015 चे वेळापत्रक