आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • WC India Wins In The First Match Against Pakistan In Cricket World Cup 2015 News In Marathi

WORLD CUP: भारतविरुद्ध पाकिस्‍तान लढत FIX होती, पाकिस्तानी व्यक्तीचा दावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्‍लामाबाद- 'वर्ल्‍डकप- 2015'मधील रविवारी (15 फेब्रुवारी) झालेल्या एका लढतीत टीम इंडियाने पाकिस्तान संघाला धो-धो धुतले. भारताने पाकिस्तानला चारीमुंड्या चीत करून 76 धावांनी दणदणीत विजय मिळवून पाकला हरवण्याचा विक्रम अबाधित ठेवला. मात्र, हा सामना फिक्स असल्याचा दावा एका पाकिस्तानी व्यक्तीने केला आहे.
सामना सुरु होण्यापूर्वी तीन तास आधी या व्यक्तीने 'ट्वीट' करून टीम इंडियाचा विजय निश्चित असल्याचे म्हटले होते.रविवारी सामना सुरु होण्‍याच्या तीन तासांपूर्वी असलम खान तनोली या व्यक्तीने टीम इंडियाचा विजयाचा दावा केला होता. टीम इंडियाची धावसंख्या किती असेल आणि पाकिस्तान किती धावांवर ऑलआऊट होईल, असे देखील असलम खान तलोनी याने म्हटले होते.

टीम इंडिया 300 धावांपेक्षा जास्त धावा करेल आणि पाकिस्‍तानी संघ 220 धावांवर ऑलआऊट होईल, असा दावा देखील तनोली याने केला होते. उल्लेखनिय म्हणजे तनोली याचे सर्व दावे खरे ठरले आहेत. मात्र, पाकिस्तान संघ 224 धावांवर ऑलआऊट झाला. तसेच तनोलीने केलेल्या 'ट्वीट'मध्ये झेल सुटणार असल्याचा देखील उल्लेख आहे. विराट कोहलीला दोनदा जीवनदान मिळणे हा 'लंडन प्‍लान'चा एक भाग असल्याचे 'ट्‍वीट'मध्ये त्याने म्हटले आहे. त्यामुळे आता भारतविरुद्ध पाकिस्तान ही लढत संशयाच्या भोवर्‍यात सापडली आहे.
कोण आहे असलम खान तनोली
ی PMLN @AslamkhanTanoli याने 'ट्विटर'वर स्वत:ला 'तनोली यूथ विंग'चा चेअरमन आणि 'पाकिस्‍तान मुस्लिम लीग'च्या (नवाज) सोशल मीडिया टीमचा को-ऑर्डिनेटर सांगितले आहे.

टीम इंडियाच्या 300 धावा...
45 व्या षटकानंतर टीम इंडिया 325 धावा बनवेल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, शेवटच्या पाच षटकात टीम इंडियाचे एका पाठोपाठ विकेट गेल्या. त्यामुळे टीम इंडिया 300 धावांपर्यंत पोहोचला.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, भारत-पाक सामन्याचा निकाल जाहीर झाल्यानंतर असलम खान तनोली याने केलेले 'ट्‍वीट'