आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • We Are Not Taking Easily To Newzeland Says Sturt Broad

यजमान न्यूझीलंडला आगामी मालिकेत सहज घेणार नाही : ब्रॉड

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑकलंड- गेल्या काही दिवसांत न्यूझीलंड क्रिकेट संघाची कामगिरी लक्षवेधी झाली नसली तरीही आम्ही किवीज टीमला सहज घेणार आहे. केव्हाही पलटी मारण्याची क्षमता या टीममध्ये आहे, असे मत इंग्लंडचा टी-20 कर्णधार स्टुअर्ट ब्रॉडने व्यक्त केले.

रॉस टेलरची कर्णधारपदावरून हकालपट्टी झाल्यानंतर ब्रेंडन मॅक्लूमच्या नेतृत्वाखालील किवीज टीमचा द. आफ्रिका दौर्‍यात लाजिरवाणा पराभव झाला होता. मात्र, किवीज टीमने वनडेत चांगली कामगिरी केली होती याकडे ब्रॉडने लक्ष वेधले. आफ्रिकेने त्यांना नुकतेच नमवले आहे हे आम्हाला माहिती आहे. त्यांच्या क्षमतेची आम्हाला जाणीव आहे. न्यूझीलंडकडे अनेक धोकादायक खेळाडू आहेत, असेही ब्रॉडने स्पष्ट केले.