आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • We Lost Because Of Batsman Failure Says Gautam Gambhir

फलंदाजांमुळे कोलकाता नाईट रायडर्सने सामना गमावला : गौतम गंभीर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर- राजस्थान रॉयल्सविरुद्ध आम्ही फारच वाईट फलंदाजी केली. आम्ही ही लढत फलंदाजांमुळेच हरलो, अशी प्रतिक्रिया कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार गौतम गंभीरने व्यक्त केली. हो, या पराभवामुळे मी खूपच निराश आहे. 145 धावांचे लक्ष्य गाठण्यासारखे होते. हे लक्ष्य अशक्य नव्हते. याशिवाय खेळपट्टीसुद्धा फलंदाजांना अनुकूल अशीच होती. आमच्या गोलंदाजांनी आपली जबाबदारी पार पाडल्यानंतर आता फलंदाजांकडून अपेक्षा होती. मात्र, आमचे फलंदाज चुकीचे फटके मारून बाद झाले, असेही तो म्हणाला.

केकेआरचा डाव अवघ्या 125 धावांत आटोपला. आम्ही निवडलेले फटके चुकीचे होते. खेळपट्टी चांगली होती, आऊटफील्डही वेगवान होती. आम्ही मोठी भागीदारी करू शकलो नाही. आमच्या चुका आम्हाला भोवल्या, असेही तो म्हणाला.