आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘भारतीय कायद्यानुसारच आपण चालायला हवे’ - पी. टी. उषा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (आयओसी) आणि भारतीय ऑलिम्पिक संघटना (आयओए) यांच्यात कलंकित पदाधिकार्‍यांमुळे सुरू असलेल्या वादात माजी आशियाई धावपटू पी. टी. उषा आयओएच्या बाजूने दिसली. आपण भारतीय कायद्याच्या हिशेबानेच चालले पाहिजे. आयओसी आपले काम करीत आहे आणि आपण आपले काम करीत आहोत, असे ती म्हणाली.

स्वामी विवेकानंद सार्धशती सोहळ्याअंतर्गत ‘भारत जागो दौड’मध्ये सहभागी होण्यासाठी ती येथे आली होती. यादरम्यान तिने ‘भास्कर’च्या प्रतिनिधीसोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या.

प्र. आयओसीच्या कडक भूमिकेनंतर आयओएने कलंकित पदाधिकार्‍यांना हटवले पाहिजे काय?

पीटी : बघा, आपण आपल्या कायद्याच्या हिशेबाने चालले पाहिजे. भारतात गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तीबाबत कायदा जे म्हणतो तसेच केले पाहिजे.

प्र. कलंकित अधिकार्‍यांना हटवले नाही तर भारत ऑलिम्पिक बाहेर असेल ?

पीटी : असे नाही होणार. लवकरच यावर तोडगा निघेल. भारत रियो ऑलिम्पिक आणि पुढच्या ऑलिम्पिकमध्येसुद्धा खेळताना दिसेल आणि आपण पदकेसुद्धा जिंकू.

प्र. रांचीत तुमची खास शिष्या टिंटू लुकाची कामगिरी विशेष ठरली नाही. काय कारण होते ?

पीटी : तसे बघितले तर टिंटूचा मुख्य इव्हेंट 800 मीटर आहे. तिने 400 मीटरमध्येसुद्धा सहभाग घेतला. यामुळे तिची कामगिरी नीट झाली नाही.

प्र. ‘भाग मिल्खा भाग’नंतर आता ‘भाग उषा भाग’ चित्रपट बनेल काय?

पीटी : याचे उत्तर माझ्याकडे नाही. मात्र, मी ‘भाग मिल्खा भाग’ चित्रपट बघितला आहे. अत्यंत शानदार चित्रपट आहे. आता माझ्यावर चित्रपट बनेल की नाही, हे मी कसे काय सांगू शकते?