आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचणार - धोनी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न - आंतरराष्ट्रीय कसोटीमधून निवृत्त झाल्यानंतर पुन्हा ऑस्ट्रेलियात परतलेल्या महेंद्रसिंग धोनीने भारतीय संघ वनडे विश्वचषकातील अंतिम सामना खेळण्यासाठी पुन्हा मेलबर्नमध्ये येईल, असा विश्वास व्यक्त केला.मागील विश्वचषकातील कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे धोनीने नमूद केले. मात्र, तेव्हाच्या विश्वचषकापेक्षा या वेळचे वातावरण वेगळे असल्याने त्या अनुरूप आम्हाला खेळ करावा लागणार आहे. नायके या कंपनीने विश्वचषकासाठी केलेल्या नवीन किटच्या अनावरणानिमित्त आयोजित सोहळ्यात तो बोलत होता.

त्रिकोणी लढती रंगणार : भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या तीन संघांच्या सामन्यांच्या तिरंगी मालिकेला अॅडिलेडमध्ये प्रारंभ होत आहे. प्रकार कोणता आहे यापेक्षा भारतीय संघाचा एक घटक म्हणून मैदानावर खेळण्याला मी अधिक महत्त्व देतो. त्यामुळे निळ्या रंगाच्या जर्सीत भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळणे मी माझे भाग्यच समजतो, असेही धोनीने नमूद केले. भारतीय संघासाठी खेळत असताना सर्वोत्तम खेळ करणे हेच माझे कायम लक्ष्य असल्याचे कोहलीने नमूद केले. ऑस्ट्रेलियात मी चांगल्या फॉर्ममध्ये असून तोच कायम राहील,अशी अपेक्षा या वेळी भारताचा कर्णधार धोनीने व्यक्त केल्या.

भारत - पाकिस्तान सामन्यापासून प्रारंभ
मेलबर्न क्रिकेट मैदान हे जगातील सर्वोत्तम मैदानांपैकी एक आहे. त्यामुळे २९ मार्चला होणा-या अंतिम सामन्यात आम्हाला पुन्हा या मैदानावर येऊन खेळायला निश्चितच आवडेल, असेही धोनीने नमूद केले. भारताच्या विश्वचषकातील अभियानाला १५ फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार आहे. पहिलाच सामना पाकविरुद्ध असल्याने जगभरातील क्रिकेटप्रेमींसाठी तो औत्सुक्याचा केंद्रबिंदू ठरणार आहे.