आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • We Will Win Against India, Pak Batsman Abbas Expressed Confidence

भारताविरुद्ध विजय मिळवू , पाक फलंदाज अब्बासचा विश्‍वास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वृत्तसंस्था - ऑस्ट्रेलियात भारतीय संघाची सध्याची कामगिरी पाहता भारताविरुद्ध प्रत्येक विश्वचषकात पराभूत होण्याची परंपरा पाकचा संघ यंदा खंडित करू शकतो, असा विश्वास पाकिस्तानचा महान फलंदाज जहीर अब्बास यांनी व्यक्त केला आहे.

आतापर्यंत विश्वचषकात भारत आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकचा सामना पाच वेळा रंगला असून त्यात प्रत्येक वेळी पाकच्या संघाला पराभव पत्करावा लागला आहे. उपांत्य फेरीत प्रवेश करणा-या संघांमध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश नक्की असेल. त्यात चौथा संघ भारत किंवा पाकिस्तानपैकी एक असू शकतो.

विराट कोहलीच फलंदाजीचा कणा
भारताची सर्व मदार त्यांच्या फलंदाजांवर असून त्यातही विराट हाच भारतीय फलंदाजीचा कणा आहे. तो विश्वचषकात कशी कामगिरी करतो, त्यावरच भारताचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. भारत - पाकच्या सामन्यातील तणाव जो संघ अधिक चांगल्या प्रकारे हाताळू शकेल, तो संघ जिंकेल, असेही अब्बास म्हणाला.