आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • We Win Because Of Ravi Rampaul Bowling Says Virat Kohli

IPL: अखेर रवी रामपॉलच्या गोलंदाजीने आम्ही बाजी मारली: विराट कोहली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने वेस्ट इंडीजचा अष्टपैलू खेळाडू रवी रामपॉलची मुक्तकंठाने स्तुती केली. रामपॉलच्या गोलंदाजीने अखेरीस आम्हाला जिंकून दिले. या वेळी आम्ही खेळाडू खरेदी करीत होतो, त्यावेळी मी संघ व्यवस्थापनाला रामपॉलला आपल्या संघात सामील करण्याचा खास आग्रह केला होता.

रामपॉलने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीत चांगली कामगिरी केली. त्याने अखेरच्या षटकात षटकार मारला नसता, तर आम्ही हा सामना गमावला असता. रामपॉलच्या उपस्थितीने दोन्ही संघात अंतर निर्माण केले, असेही त्याने नमूद केले. श्रीलंकेत झालेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये रामपॉलने चांगली कामगिरी केली होती.