आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • We Won't Get Carried Away With Chennai Win: Ross Taylor

IPL: पाय जमिनीवर ठेवण्याचा टेलरचा सल्ला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई- दोन वेळेसचा चॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्जला हरवल्यानंतर निश्चितपणे आम्हाला आनंद झाला. आमची टीम आनंदात आहे. आमच्या खेळाडूंनी या मोठ्या विजयानंतर फार वेळ तो-यात राहू नये. त्यांनी पटकन भानावर यावे आणि पुढच्या सामन्यासाठी सज्ज व्हावे, असा सल्ला पुणे वॉरियर्सचा प्रभारी कर्णधार आणि फलंदाज रॉस टेलरने दिला आहे.

स्पर्धा आणखी बरीच शिल्लक आहे. आम्ही एका विजयाच्या जोशात फार वेळ राहू शकत नाही. पुढच्या सामन्याची तयारी केली पाहिजे. अवघ्या दोन दिवसांतच पुढची लढत पुण्यात आहे. पुढचा सामनासुद्धा कठीण आहे. पुढच्या लढतींना कोणीही सहज घेऊ नये. स्पर्धेतील प्रत्येक सामना महत्वपूर्ण आहे, असे त्याने नमूद केले.