आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Weambledon Tenis: Muray, Serena Entered In Second Round

विम्बल्डन टेनिस: मुरे, सेरेना यांचा दुस-या फेरीत प्रवेश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - ऑलिम्पिक पदकविजेता इंग्लंडच्या अँडी मुरेने आपल्या घरच्या कोर्टवर दमदार प्रदर्शन करताना जर्मनीच्या बेंजामिन बेकरला सरळ सेटमध्ये पराभूत केले. मुरेने 6-4, 6-3, 6-2 ने विजय मिळवत विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या दुस-या फेरीत प्रवेश केला आहे.


इंग्लंडसाठी 76 वर्षांनंतर ग्रँडस्लॅमचा दुष्काळ संपवणा-या मुरेने मागच्या सप्टेंबर महिन्यात यूएस ओपन ग्रँडस्लॅम जिंकले होते. मुरे कोर्टवर येताच प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून त्याचे स्वागत केले. ब्रिटिश खेळाडूनेसुद्धा शानदार खेळ करून आपल्या घरच्या प्रेक्षकांना खुश केले.


मुरेने 32 वर्षीय बेकरला विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या पहिल्या फेरीत पराभूत करून माजी ब्रिटिश टेनिसपटू फ्रेड पेरी यांचा 106 सामने जिंकण्याच्या विक्रम मोडला. मुरेने आता या वेळी विम्बल्डनचे विजेतेपद पटकावले तर 1936 नंतर पेरी यांच्या ग्रँडस्लॅमनंतर विम्बल्डन जिंकणारा तो पहिला ब्रिटिश खेळाडू ठरेल.


12 ग्रँडस्लॅम विजेता स्पेनचा राफेल नदाल ग्रँडस्लॅम स्पर्धेत पहिल्यांदा पहिल्या फेरीत गारद झाल्यानंतर कमी मानांकित खेळाडूंकडून अधिक मानांकित खेळाडूंच्या पराभवाची मालिका सुरू झाली. इतर सामन्यांत 11 वा मानांकित स्वित्झर्लंडच्या स्टानिसलास वावरिंकाला जागतिक क्रमवारीत 70 व्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलिया लियोटन हेविटकडून हार मानावी लागली. हेविटने त्याला 4-6, 5-7, 3-6, 3-5 ने मात दिली. 35 वा मानांकित लुकास रोसोलला यावर्षी पहिल्याच फेरीत पराभव स्वीकारावा लागला. रोसोलला जर्मनीच्या ज्युलियन रिस्टरने पाच सेटपर्यंत रंगलेल्या संघर्षपूर्ण सामन्यात 6-3, 4-6, 7-6, 6-7, 6-4 ने पराभूत करून स्पर्धेबाहेर केले. रोसोलने मागच्या दुस-या फेरीत राफेल नदालला पराभूत करून दणकेबाज विजय मिळवला होता. अमेरिकेच्या राजीव रामने स्लोवाकियाच्या लुकास लाकोला 77:, 6-4, 6-7, 6-2 ने पराभूत केले.


सेरेना, ली ना दुस-या फेरीत
महिला गटात जगातील नंबर वन सेरेना विल्यम्स आणि माजी फ्रेंच ओपन चॅम्पियन ली नाने मंगळवारी विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या दुस-या फेरीत धडक मारली. गतविजेत्या सेरेनाने पहिल्या फेरीत मेंडी मिनेलाचा पराभव केला. तिने 6-1, 6-3 अशा फरकाने सामना जिंकला. चीनच्या ली नाने हॉलंडच्या मिशेला क्रायजेकवर सरळ दोन सेटमध्ये 6-1, 6-1 ने विजय मिळवला.


फ्रेंच ओपन विजेती व अव्वल मानांकित सेरेनाने दमदार सुरुवात करताना पहिला सेट 6-1 ने जिंकला. मात्र, मिनेलाने दुस-या सेटमध्ये पुनरागमन केले. तिने सुरुवातीला 2-0 ने आघाडी घेतली. मात्र, सेरेनाने सलग चार गेम जिंकून 4-2 ने आघाडी मिळवली. त्यानंतर तिने ही लय कायम ठेवत दुसरा सेट 6-3 ने जिंकला. महिलांच्या गटात 14 व्या मानांकित समंथा स्तोसुरने स्लोव्हाकियाच्या अ‍ॅना कॅरोलिनाचा पराभव केला.


योकोविकची विजयी सलामी
अव्वल मानांकित नोवाक योकोविकने मंगळवारी विम्बल्डन टेनिस स्पर्धेत विजयी सलामी दिली. त्याने जर्मनीच्या लोरियन मेयरचा पराभव केला. सर्बियाच्या खेळाडूने 56 मिनिटांत 6-3, 7-5, 6-4 ने सामना जिंकला.