आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Weatherman Nadal Compares Playing Conditions At Indian Wells, Miami Newsin Marathi

मियामी मास्टर्स टेनिस स्पर्धेत राफेल नदालचा दमदार विजय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मियामी- दुसऱ्या मानांकित राफेल नदालने मियामी मास्टर्स टेनिस स्पर्धेतील अापल्या किताबाच्या माेहिमेला दमदार सुरुवात केली. त्याने शानदार विजयासह पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत धडक मारली. दुसऱ्या मानांकित खेळाडूने एकेरीच्या दुसऱ्या फेरीत स्पेनच्या निकाेलस अलमाग्राेचा पराभव केला. त्याने सरळ दाेन सेटमध्ये ६-४, ६-२ अशा फरकाने एकतर्फी विजय मिळवला.

गुडघ्याच्या गंभीर दुखापतीनंतरही त्याने अापली विजयी लय कायम ठेवत पुढची फेरी गाठली. ‘या सामन्यात मी चांगल्या प्रकारे खेळलाे. यादरम्यान दुखापतीचा मी काेणताही विचार केला नाही. अाता अागामी सामन्यातही लय अबाधित ठेवण्याचा माझाा प्रयत्न असेल,’ अशी प्रतिक्रिया नदालने विजयानंतर दिली.

वेगवान सर्व्हिससह नदालने पहिल्या गेममध्ये काेर्टवर जम बसवला. त्याने ५३ मिनिटांत पहिला सेट अापल्या नावे केला अाणि अाघाडी घेतली. त्यानंतर सहजपणे दुसऱ्या गेममध्येही बाजी मारली. अँडी मरेने डाेनाल्ड यंगला ६-४, ६-२ ने हरवले.