आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Weight Lifting At Aurangabad, Sports News In Marathi

राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धा, विजय शिंदे चौथ्या स्थानावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- विभागीय क्रीडा संकुलात झालेल्या 54 व्या राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. औरंगाबादचे प्रतिनिधित्व करणार्‍या गणेश दुसारियाने 70 किलो वजनी गटात तिसरे स्थान पटकावले. दुसरीकडे 55 किलो गटात विजय शिंदे व 65 किलोत रणजित शिंदेने चौथे, 60 किलो गटात कैलास तेलंगेने पाचवे स्थान मिळवले.
तसेच 75 किलोत अजिंक्य रेडेकर चौथ्या आणि राज भांडवले पाचव्या स्थानी राहिला.

गोरखालँडच्या मनोजकुमारने 55 किलोचे विजेतेपद पटकावले. दिल्लीचा सोनू उपविजेता ठरला. पंजाबच्या सूरज मोहनला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. 60 किलो गटात दिल्लीच्या सुमीतकुमारने सुवर्णपदकावर नाव कोरले. त्याचाच सहकारी दिल्लीच्या विराजने रौप्यपदक जिंकले. उत्तर प्रदेशच्या मो. इसाक ने कांस्यपदक पटकावले. कर्नाटकचा गणेश चौथ्या आणि महाराष्ट्राचा कैलास पाचव्या स्थानी राहिला. 65 किलोत हरियाणाच्या अविनने प्रथम आणि उत्तर प्रदेशच्या किशनकुमारने दुसरा क्रमांक मिळवला. विजेत्यांना संघटनेचे सरचिटणीस डॉ. संजय मोरे, महापौर कला ओझा, पोलिस आयुक्त राजेंद्र सिंह, बेनी फ्रान्सिस यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.