आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेश, विजय, महेश राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेच्या फायनलमध्ये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- विभागीय क्रीडा संकुलात सुरू असलेल्या राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेच्या प्री-जजिंग स्पर्धेत यजमान महाराष्ट्राच्या खेळाडूंनी दबदबा कायम राखला. राज्यातील स्टार शरीरसौष्ठवपटू मि. वर्ल्ड सुहास खामकर स्पध्रेत सहभागी झाला नसल्याने ‘भारत र्शी’ची आशा थोडी कमी झाली आहे. दुसरीकडे महेंद्र पगडे आणि गणेश शेंडगे यांनी मात्र आपली दावेदारी कायम राखली.

यजमान खेळाडूंत 55 किलोत विजय शिंदे, 60 किलोत कैलास तांगडे, 65 किलोत रणजित शिंदे, 70 किलोत गणेश दुसारिया आणि विजय मोरे, 75 किलोत अजिंक्य रेडेकर, 90 किलोत पवन कुमत आणि देवेंद्र भोईर, 100 किलोत महेंद्र पगडे व सचिन, 100 किलोवरील गटात गणेश शेंडगेने अंतिम फेरीत स्थान मिळवले.

मोठय़ा वजनी गटात संघर्षपूर्ण लढत
स्पर्धेत 100 किलोवरील गटाच्या फायनलमध्ये दिल्लीचा विनय, गुजरातचा सिद्धार्थ पांडे, हरियाणाचा आशितोष चौधरी, गुजरातचा रजनीकांत परमार आणि महाराष्ट्राचा गणेश शेंडगे यांच्यात जोरदार चुरस आहे. हरियाणा आणि महाराष्ट्राच्या खेळाडूंत कडवी लढत पाहायला मिळेल.