आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wembeldon Tenis: Federre, Azarenka Won; Nadal, Sara Irani Defeated

विम्बल्डन टेनिस: फेडरर, अझारेंका विजयी; नदाल, सारा इराणी बाहेर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - गतविजेता रॉजर फेडररने विम्बल्डन टेनिस स्पर्धेत सोमवारी विजयाने सुरुवात केली. त्याने पुरुष एकेरीच्या रोमानियाच्या व्हिक्टर हनेस्कूचा 6-3, 6-2, 6-0 ने पराभव केल. यासह त्याने दुस-या फेरीतील प्रवेश निश्चित केला. महिला गटात व्हिक्टोरिया अझारेंका, अ‍ॅना इव्हानोविकने आगेकूच केली. मात्र, स्पेनचा राफेल नदाल व इटलीच्या सारा इराणीचा पहिल्या फेरीत पराभव झाला.


महिला एकेरीत व्हिक्टोरिया अझारेंका व सर्बियाच्या अ‍ॅना इव्होनोविकने पहिल्या फेरीतील लढती जिंकल्या. ऑस्ट्रेलियाच्या जुर्गेन मेल्जरने इटलीच्या फेबियो फोगनिनीवर 6-7, 7-5, 6-3, 6-2 ने मात केली. पोलंडच्या लुकास कुबोटने रशियाच्या इगोर आंद्रीवला 6-1, 7-5, 6-2 ने हरवले.


नदाल, साराचा पराभव
फ्रेंच ओपन विजेता राफेल नदाल व सारा इराणीला पहिल्या फेरीत अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला. जागतिक क्रमवारीत 135 व्या स्थानी असलेल्या स्टीवन डार्सिसने नदालचा पराभव केला. त्याने 7-6, 7-6, 6-4 अशा फरकाने जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असलेल्या नदालला धूळ चारली. त्याचा सामना आता पोलंडच्या लुकास कुबोतशी होईल. बिगरमानांकित मोनिका पुइगने इटलीच्या पाचव्या मानांकित सारा इराणीला सरळ दोन सेटमध्ये 6-3, 6-2 अशा फरकाने पराभूत केले.


दुखापतीनंतरही अझारेंका विजयी
दुस-या मानांकित अझारेंकाने दुखापतीनंतरही पोर्तुगालच्या मारिया जोआजो कोहलरवर 6-1, 6-2 ने मात केली. या लढती दरम्यान बेलारूसची खेळाडू दोन वेळा कोर्टवर पडली होती. यामुळे तिच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली. मात्र, तिने माघार न घेता सामन्यात सहज विजय मिळवला. तसेच 12 व्या मानांकित अ‍ॅना इव्हानोविकने फ्रान्सच्या वर्जिनी रज्जानोला 7-6, 6-0 ने पराभूत केले.दरम्यान, वर्जिनीने पहिल्या सेटमध्ये प्रत्युत्तराचा प्रयत्न केला.मात्र, इव्हानोविकने बाजी मारली. इटलीच्या लाविया पेनेटाने इंग्लंडच्या बाल्टेकाला 6-4, 6-1 ने हरवले.