आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • West Bengal Cricket Association Want To Host Sachin\'s 200 Test

सचिनच्या 200 वी कसोटीचे यजमानपद स्वीकारणार पश्चिम बंगाल क्रिकेट संघटना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने स्वत:हून आपल्या भविष्याबाबत अद्याप कोणताच निर्णय घेतलेला नसला तरीही क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालने (कॅब) या महान खेळाडूच्या (बहुतेक अखेरच्या) 200 व्या कसोटीचे यजमान स्वीकारण्याची इच्छा व्यक्त केली आहे.


सचिनकडून अद्याप 200 व्या कसोटीनंतर निवृत्तीसारखे कसलेच संकेत मिळालेले नाही. मात्र, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सचिनची 200 वी कसोटी भारतात होण्यासाठी वेस्ट इंडीज दौ-याचे आयोजन केले आहे. अशा परिस्थितीत कॅबने इच्छा व्यक्त केली आहे की, दोन कसोटी सामन्यांच्या प्रस्तावित मालिकेतील दुसरा आणि मास्टर-ब्लास्टरचा 200 वा कसोटी सामना ईडन गार्डनवर आयोजित केला जावा. कॅबने यासाठी बीसीसीआयकडे पत्र लिहून विनंती सुद्धा केली आहे.