अॅडिलेड - वेस्टइंडिजचा ऑल राऊंडर किरन पोलार्डने ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या टी-20 बीग बॅश लिगच्या वॉर्मअप मॅचमध्ये एकाच ओव्हरमध्ये सहा षटकार लगावले आहे. बीग बॅशमध्ये हा कारनामा करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. अॅडिलेडमधील प्रिंस अल्फ्रेड कॉलेजच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात पोलार्ड अॅडिलेड स्ट्रायकर्सकडून खेळत होता. त्याने मेलबर्न स्टार्सच्या अँथोनी मार्टीनच्या गोलंदाजीवर सहा चेंडूवर सहा षट्कार लगावले.
भारताच्या युवराजसिंहने टी-20 विश्वचषकात इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडच्या ओव्हरमध्ये हा विक्रम याआधीच केलेला आहे. त्याने कवेळ 12 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते.
अॅडिलेड स्ट्रायकर्सकडून खेळणार्या पोलार्डने एक षटकार 140 मीटर लगावला. त्याने मेलबर्न स्टार्सविरोधात खेळताना 27 चेंडूत 48 धावांची खेळी केली.
ब्रॅड हॉगने म्हटले बीग हिटर
ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर ब्रॅड हॉगने पोलार्डला बीग हिटर उपाधी दिली. तो म्हणाला, 'माझ्या क्रिकेटच्या कारकीर्दीत मी प्रथमच अशी स्फोटक फलंदाजी पाहिली. पोलार्ड बीग हिटर आहे. त्याची फलंदाजी लाजवाब आहे.' ज्यावेळी पोलार्ड षटकारांची आतषबाजी करत होता, तेव्हा नॉनस्ट्रायकिंग एंडला ब्रॅड हॉग होता.
पुढील स्लाइडमध्ये, युवराज आधी या दिग्गजाने लगावले सहा चेंडूत सहा षट्कार