आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंडीज मालिकेत बदल, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने घेतला वेळापत्रक बदलाचा निर्णय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील क्रिकेट दौऱ्याच्या कार्यक्रमात बीसीसीआयने काही बदल केले आहेत. नव्या कार्यक्रमानुसार नवी दिल्ली येथे २२ ऑक्टोबर रोजी होणारा ट्वेंटी-२० सामना कटक येथे हलवण्यात आला आहे. विशाखापट्टणम येथे ११ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्याऐवजी १४ ऑक्टोबर रोजी तिसरा एकदिवसीय सामना होईल. विशाखापट्टणम येथील सामना आता नवी दिल्ली येथे ११ ऑक्टोबरला होईल.
बीसीसीआयने वेस्ट इंडीज संघाला सरावासाठी दोन एकदिवसीय सामने दिले असून हे दोन्ही सामने मुंबईत होतील. त्यापैकी ३ ऑक्टोबरचा पहिला सराव सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर १९ वर्षांखालील भारतीय संघाबरोबर होईल. धरमशाला येथील सामना २० ऑक्टोबरऐवजी १७ ऑक्टोबरला होईल, तर १७ ऑक्टोबरला कोलकाता येथे होणारा सामना आता २० ऑक्टोबरला होईल.
कसोटी सामने मात्र पूर्वनियोजित ठिकाणी व ठरलेल्या तारखांनाच सुरू होतील. हैदराबाद येथील पहिली कसोटी ३० ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबरदरम्यान होईल. दुसरी कसोटी बंगळुरूला ७ ते ११ नोव्हेंबरदरम्यान, तर तिसरी कसोटी १५ ते १९ नोव्हेंबर या कालावधीत अहमदाबाद येथे होईल.
सराव सामना मुंबईविरुद्ध
विंडीजचा दुसरा सराव सामना वानखेडे स्टेडियमवर
५ ऑक्टोबरला यजमान मुंबईबरोबर होईल.
पुढील स्‍लाइडवर पाहा, सुधारीत वेळापत्रक