आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंग्लंडला पराभूत केलेला आयर्लंड आज घेणार विंडीजची परीक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेल्सन - वेस्टइंडीज आणि आयर्लंड संघ सोमवारी विश्वचषकात मोहिमेला सुरुवात करतील. वेस्ट इंडीज संघाचे सामन्यातील पारडे जड आहे. मात्र, आयरीश संघ सनसनाटी विजयासाठी ओळखला जातो. त्यांनी २००७ मध्ये पाकला तर २०११ मध्ये इंग्लंडला पराभूत केले होते.
याशिवाय विश्वचषकाच्या सराव सामन्यातही आयर्लंडने बांगलादेशवर मात करून आपण फॉर्मात असल्याचे दाखवून दिले. दुसरीकडे वेस्ट इंडीजला मोठ्या संघर्षानंतर स्कॉटलंडविरुद्ध तीन धावांनी विजय मिळवता आला. त्यामुळे हा सामना अधिक रोमांचक होण्याची शक्यता आहे.