सेंट लुईस - दुस-या कसोटी लढतीत वेस्ट इंडीजने बांगलादेशवर २९६ धावांनी मोठा विजय मिळवला. पहिल्या डावात वेस्ट इंडीजने ३८० धावा काढल्या. त्यांनतर बांगलादेशला १६१ धावांवर रोखले. दुसऱ्या डावात वेस्ट इंडीजने २६९ धावांवर डाव घोषित केला. बांगलादेशसमाेर ४८९ धावांचे लक्ष्य ठेवले.
प्रत्युत्तरात बांगलादेशचा डाव १९२ धावांवर संपुष्टात आला. पहिल्या डावात अर्धशतक आणि दुसऱ्या डावात नाबाद १०१ धावा ठोकणारा वेस्ट इंडीजचा शिवनारायण चंद्रपॉल सामनावीर ठरला.
तिसऱ्या दिवसअखेर चार बाद २०८ धावांच्या पुढे खेळताना वेस्ट इंडीजने २६९ धावांवर डाव घोषित केला. विंडीजने दिलेल्या ४८९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा डाव १९२ धावांवर संपुष्टात आला. यात तमीम इक्बाल आणि मोमीनुल हकने अर्धशतक लगावले. मात्र ते संघाला विजय मिळवून देऊ शकले नाही.